अंक, numbers,digits काहीही म्हणा पण त्यांचा आपल्या आयुष्यात असलेला महत्व अनन्यसाधारण. म्हणूनच बरेचदा आपण म्हणतो "आयुष्याचा गणित".गम्मत असते हा ह्या अंकांची, त्यांची किमयाच निराळी.
अंकांचा शोध कोणी लावला? शून्याचा जन्म भारतात झाला इतकंच माहिती. विचार करू शकतो आपण अंकांशिवाय आपल्या रोजच्या जगण्याचा? लहानपणी पाढे पाठ करताना वाटायचं अरे काय हि कटकट कुणी काढले हे पाढे? माझ्या न शिकलेल्या आज्जी ला देखील निमकी,पावकी यायची? आता म्हणाल ये किस चिडिया का नाम है? निमकी म्हणजे divided by 2 आणि पावकी म्हणजे divided by 4. माझी गाडी कधी १३ च्या पुढे सरकलीच नाही. नकोसे वाटायचे लहानपणी हे अंक. पण आता निट विचार केला तर हे अंक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत हे जाणवत . इतके पैसे, इतके मित्र, इतकी फी इतका पगार,सगळा ह्या अंकांचा खेळ. लहान मुला पासून म्हातारया माणसां पर्यंत सगळे नाचतात ह्या अंकांच्या तालावर. ह्या महिन्या अखेरीस मी घरी जाणार आहे. जेव्हा फोने करेन तेव्हा माझी बहिण नेहेमी आठवण करून देते ताई अजून बरोबर ५५ दिवसांनी तू येणार!!!!!! मग त्याचे ४२ होतात मग ३० मग १९ असे करत करत अधिक अधिक जवळ येत चालल्याची जाणीव तो COUNTDOWN वेगळाच अनुभव सारा .विचार करा अंक नसते तर कुठलं घड्याळ आणि कुठलं कॅलेंडर? हे अंक तारीख बनवतात आणि मग आपण ती लक्षात ठेवतो. पंचांग मुहूर्त सगळ तर ह्याच भोवती फिरतं ना!!!! कोटी कोटी वर्ष झाली दिवस तसेच असतात सूर्य उगवतो आणि मावळतो त्यात काही फरक नाही पण तारीख त्या दिवसाला ओळख देते महत्व देते. आणि अचानक तो दिवस इतरांपेक्षा वेगळा होऊन जातो. दसरा- दिवाळी चा दिवस असा काय वेगळा असतो इतर दिवसापासून पण आपण तो राम-विजय म्हणून वर्षा नु वर्ष साजरा करतो. लाखो घरात करोडो दिवे जळतात सगळ कस दैदिप्यमान होऊन जातं. किती हि दुख असलं तरी सणाच्या दिवशी वेगळा हसू चेहेर्यावर उमटत. हि तारखेचीच कमाल कि एका दिवशी अक्खा देश आनंद साजरा करत असतो. निमित्य तेच पण उत्सव नेहेमी नवीन. राम होता न्हवता ह्याला काही महत्व उरत नाही तो होता आणि आजच्या दिवशी तो जिंकला ह्याचच महत्व मागे राहत. अगदी इतका कि अमेरिकेतले भारतीय विध्यार्थी सुद्धा DIWALI NIGHT ह्या नावाखाली CELEBRATE करतात. आता CELEBRATE करायला निमित्य म्हणून अगदी नेहेमी राम कृष्णाच कशाला हवा? आपल्या लग्नाचा वाढदिवस, मुलाचा पहिला वाढदिवस आणि VALENTINES DAY सगळ सगळ लक्षात असत ते तारखेमुळेच. अगदी परवडत नसला तरी बायको साठी नवरा गजरा तरी आणतोच लग्नाचा वाढदिवस म्हणून. आणि तो ५ रुपयाचा गजरा अनमोल आनंद देणार हसू फुलवतो बायको च्या चेहेर्यावर ते तारखेमुळेच. इतर सगळ्या जगासाठी ती तारीख नेहेमी सारखी असते रोजची कटकट ऑफिस ची काम. पण त्या दोन जीवांसाठी ती तारीख SPECIAL असते. कित्येक वर्ष सोबत घालवल्या दिवसांचा प्रवास ते एका दिवसात करतात आठवतात आणि ह्याचा श्रेय जातं ते तारखेलाच. आनंदी राहण्यासाठी नेहेमी लॉटरी, लागणे पगार वाढणे अशीच कारण लागतात अस नाहीये, कारण काही असो साजरा करणं महत्वाचं, आनंदी राहणं महत्वाचं. लहानपणी वाढदिवस हा सगळ्यात भारी दिवस वाटायचा. जणू तो दिवस फक्त आपलाच आहे त्यावर आपली मक्तेदारी आहे. नवीन कपडे SPECIAL CAKE CHOCLATES मज्जाच मज्जा. माझी मैत्रीण शामल तिचा वाढदिवस ९ सेप्तेम्बेर आणि माझा ११ नोव्हेंबर जरा इतरांपेक्षा अनोखा ९/९ आणि ११/११ नेहेमी लक्षात राहणारा. बर्याच वर्षान पुरवी माझी ६वीत असलेली बहिण म्हणाली अगं २००९ साली शामल ताई चा वाढदिवस ९/९/९ आणि २०११ साली तुझा ११/११/११ आणि तू त्या दिवशी २५ वर्षाची होणार. तेव्हा पासून नकळत हि तारीख मनात घर करून बसली. २५ वा वाढदिवस ११/११/११. मोठी झाले तशी वाढदिवसाचा भूत डोक्यातून उतरला. PHONE SMS ह्या वरच बराचसा दिवस जाऊ लागला. तस पाहायला गेला तर इतर दिवासंसारखा तो दिवस पण यंदा ह्या ११/११/११ ची वेगळीच कमाल होती. बर्याच्या श्या लोकांनी म्हणे हि तारीख अनोखी म्हणून साजरी केली. आजी शी वाढदिवस म्हणून बोलले तर आज्जी हि म्हणे अगं यंदा काय विशेष मग ११/११/११ चं? सार्या भारताने तुझा वाढदिवस साजरा केला!!!!!! ती हि खूप उत्साही दिसली. काय जादू ह्या तारखेची माझ्या आजीचं ते हास्य आई चा उत्साह सगळाच अनमोल.सण वार वाढदिवस पगार वाढ इत्यादी कारण नसताना हि असंख्य लोकांना आनंद देऊन गेली हि ११/११/११. मग परत एकदा पटल आनंदासाठी कारण, निमित्य महत्वाचा नसतं. क्षुल्लक शी तारीख हि दुख थोड्या वेळा पुरतं विसरायला लाऊन आनंद,उत्साह जागा करू शकते. आणि शेवटी रोटी कपडा मकान ह्या गरजा भागल्यानंतर गरज असते ती आनंदाची.
हे सगळा सांगण्याचा निमित्य म्हणजे कारण शोधात बसू नका कारण काही असो ते साजरा करा तो दिवस तुम्ही स्वतः इतर दिवसांपेक्षा वेगळा करा. रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून १ तास स्वतःसाठी काढा आणि तो आपल्या लोकांसाठी SPECIAL बनवा. आनंद नेहेमीच आपोआप मिळतो असा नाहीये रोजचा आयुष्यात वेगळा काही तरी करूनही तो मिळवता येतो.!!!!
चारुता........!!!!!!

मस्त लिहिलयस ताई.... :)
ReplyDeleteआणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. :)
तुझ्या आयुष्याच्या अंकगणितात आनंदी क्षणांची बेरीज, दुखांची वजाबाकी,
यशाचा गुणाकार आणि अपयशाचा भागाकार होऊदे....
दुखं तेवढीच असोत कि हाताच्या बोटावरच मोजता येतील,
आणि सुखं एवढी कि मोजण्यासाठी कॅल्क्यूलेटर , कंप्युटर आणि सुपरकंप्युटर सुद्धा कमी पडतील....
It's nice one...
ReplyDeleteThank you atul
Deletegood 1
ReplyDeleteWow Charu tu kiti mast lihite... :)Bright writer.
ReplyDeleteu have emoted your feelings very well.
specially d countdown thing told to you by your sister... awesome.
And also the not so imp numbers becomin sole part of life!!!
MAST :)
charu fantastic :) :) :)
ReplyDeletevery happy to see your blog ,,, u r indeed a best writer .... keep it up ,,,
countdown n 11/11/11 was best part of this article ,,,
kharach ankanshivay kahich purn hot nahi ,,,
aanand du:kh kahich naahi ,,, gr8 start ,,, n hope to see more articles on this ,, keep writing
ur blog jus remind me our discussion about DIARY :):) do u remember it? ;)
Expressed nicely. Your writing skill -- flow of language is simple & natural. Keep it up.
ReplyDeleteThank you Mr Uday Kashikar.
Delete