Tuesday, November 15, 2011

अंकगणित

अंक, numbers,digits काहीही म्हणा पण त्यांचा आपल्या आयुष्यात असलेला महत्व अनन्यसाधारण. म्हणूनच बरेचदा आपण म्हणतो "आयुष्याचा गणित".गम्मत असते हा ह्या अंकांची, त्यांची किमयाच निराळी.

अंकांचा शोध कोणी लावला? शून्याचा जन्म भारतात झाला इतकंच माहिती. विचार करू शकतो आपण अंकांशिवाय आपल्या रोजच्या जगण्याचा? लहानपणी पाढे पाठ करताना वाटायचं अरे काय हि कटकट कुणी काढले हे पाढे? माझ्या न शिकलेल्या आज्जी ला देखील निमकी,पावकी यायची? आता म्हणाल ये किस चिडिया का नाम है? निमकी म्हणजे divided by 2 आणि  पावकी म्हणजे divided by 4. माझी गाडी कधी १३ च्या पुढे सरकलीच नाही. नकोसे वाटायचे लहानपणी हे अंक. पण आता निट विचार केला तर हे अंक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत हे जाणवत . इतके पैसे, इतके मित्र, इतकी फी इतका पगार,सगळा ह्या अंकांचा खेळ. लहान मुला  पासून म्हातारया माणसां पर्यंत सगळे नाचतात ह्या अंकांच्या तालावर. ह्या महिन्या अखेरीस मी घरी जाणार आहे. जेव्हा फोने करेन तेव्हा माझी बहिण नेहेमी आठवण करून देते ताई अजून बरोबर ५५  दिवसांनी तू येणार!!!!!!  मग त्याचे ४२ होतात मग ३० मग १९ असे करत करत अधिक अधिक जवळ येत चालल्याची जाणीव तो COUNTDOWN  वेगळाच अनुभव सारा .विचार करा अंक नसते तर कुठलं घड्याळ आणि कुठलं कॅलेंडर? हे अंक तारीख बनवतात आणि मग आपण ती लक्षात ठेवतो. पंचांग मुहूर्त सगळ तर ह्याच भोवती फिरतं ना!!!! कोटी कोटी  वर्ष झाली दिवस तसेच असतात सूर्य उगवतो आणि मावळतो त्यात काही फरक नाही पण तारीख त्या दिवसाला ओळख देते महत्व देते. आणि अचानक तो दिवस इतरांपेक्षा वेगळा होऊन जातो. दसरा- दिवाळी चा दिवस असा काय वेगळा असतो इतर दिवसापासून पण आपण तो राम-विजय म्हणून वर्षा नु वर्ष साजरा करतो. लाखो घरात करोडो दिवे जळतात सगळ कस  दैदिप्यमान होऊन जातं. किती हि दुख असलं तरी सणाच्या दिवशी वेगळा हसू चेहेर्यावर उमटत. हि तारखेचीच कमाल कि एका दिवशी अक्खा देश आनंद साजरा करत असतो. निमित्य तेच पण उत्सव नेहेमी नवीन. राम होता न्हवता ह्याला काही महत्व उरत नाही तो होता आणि आजच्या दिवशी तो जिंकला ह्याचच महत्व मागे राहत. अगदी इतका कि अमेरिकेतले भारतीय  विध्यार्थी सुद्धा  DIWALI  NIGHT ह्या नावाखाली CELEBRATE  करतात. आता CELEBRATE करायला निमित्य म्हणून अगदी नेहेमी राम कृष्णाच कशाला हवा? आपल्या लग्नाचा वाढदिवस, मुलाचा पहिला वाढदिवस आणि VALENTINES  DAY सगळ सगळ लक्षात असत ते तारखेमुळेच. अगदी परवडत नसला तरी बायको साठी नवरा गजरा तरी आणतोच लग्नाचा वाढदिवस म्हणून. आणि तो ५ रुपयाचा गजरा अनमोल आनंद देणार हसू फुलवतो बायको च्या चेहेर्यावर ते तारखेमुळेच. इतर सगळ्या जगासाठी ती तारीख नेहेमी सारखी असते रोजची कटकट ऑफिस ची काम. पण त्या दोन जीवांसाठी ती तारीख SPECIAL असते. कित्येक वर्ष सोबत घालवल्या दिवसांचा प्रवास ते एका दिवसात करतात आठवतात आणि ह्याचा श्रेय जातं ते तारखेलाच. आनंदी राहण्यासाठी नेहेमी लॉटरी, लागणे पगार वाढणे अशीच कारण लागतात अस नाहीये, कारण काही असो साजरा करणं महत्वाचं, आनंदी राहणं महत्वाचं. लहानपणी वाढदिवस हा सगळ्यात भारी दिवस वाटायचा. जणू तो दिवस फक्त आपलाच आहे त्यावर आपली मक्तेदारी आहे. नवीन कपडे SPECIAL CAKE CHOCLATES मज्जाच मज्जा. माझी मैत्रीण शामल तिचा वाढदिवस ९ सेप्तेम्बेर आणि माझा ११ नोव्हेंबर जरा इतरांपेक्षा अनोखा ९/९ आणि ११/११ नेहेमी लक्षात राहणारा. बर्याच वर्षान पुरवी माझी ६वीत असलेली बहिण म्हणाली अगं २००९ साली शामल ताई चा वाढदिवस ९/९/९ आणि २०११ साली तुझा ११/११/११ आणि तू त्या दिवशी २५ वर्षाची होणार. तेव्हा पासून नकळत हि तारीख मनात घर करून बसली. २५ वा वाढदिवस ११/११/११. मोठी झाले तशी वाढदिवसाचा भूत डोक्यातून उतरला.  PHONE SMS  ह्या वरच बराचसा दिवस जाऊ लागला. तस पाहायला गेला तर इतर दिवासंसारखा तो दिवस पण यंदा ह्या ११/११/११ ची वेगळीच कमाल होती. बर्याच्या श्या लोकांनी म्हणे हि तारीख अनोखी म्हणून साजरी केली. आजी शी वाढदिवस म्हणून बोलले तर आज्जी हि म्हणे अगं यंदा काय विशेष मग ११/११/११ चं? सार्या भारताने तुझा वाढदिवस साजरा केला!!!!!! ती हि खूप उत्साही दिसली. काय जादू ह्या तारखेची माझ्या आजीचं  ते हास्य आई चा उत्साह सगळाच अनमोल.सण वार वाढदिवस पगार वाढ इत्यादी कारण नसताना  हि असंख्य लोकांना आनंद देऊन गेली हि ११/११/११. मग परत एकदा पटल आनंदासाठी कारण, निमित्य महत्वाचा नसतं. क्षुल्लक शी तारीख हि दुख थोड्या वेळा पुरतं विसरायला लाऊन आनंद,उत्साह जागा करू शकते.  आणि शेवटी रोटी कपडा मकान ह्या गरजा भागल्यानंतर गरज असते ती आनंदाची.

हे सगळा सांगण्याचा निमित्य म्हणजे कारण शोधात बसू नका कारण काही असो ते साजरा करा तो दिवस तुम्ही स्वतः इतर दिवसांपेक्षा वेगळा करा. रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून १ तास स्वतःसाठी काढा आणि तो आपल्या लोकांसाठी SPECIAL बनवा. आनंद नेहेमीच आपोआप मिळतो असा नाहीये रोजचा आयुष्यात वेगळा काही तरी करूनही तो मिळवता येतो.!!!!

चारुता........!!!!!!

Saturday, April 30, 2011

आयुष्य एक चित्र

आज खूप दिवसांनी एका मैत्रिणीशी बोलले.रेश्मा आपटे. एक अशी मैत्रीण जिला मी न भेटलीये न पाहिलंय पण खूप जवळची कदाचित जिवाभावाची म्हणाले तर गैर वाटणार नाही. आमच्या गप्पा खूप रंगल्या अगदी diary  पासून आयुष्या पर्यंत आणि तीच माझी प्रेरणा blog लिहिण्या मागची. आयुष्य असतं तरी काय नेमका? माणसं वेग वेगळी का असतात? पु . ल. नी व्यक्ती आणि वल्ली लिहावा इतके वेगळे स्वभाव का असतात? विचार केल्यावर उत्तर मिळालं सगळच चांगलं किवा सगळं वाईटच  असतं तर जगण्यात मजा आली असती का?आयुष्य एक चित्र असतं माणसं त्याचे चित्रकार आणि त्यांचे स्वभाव म्हणजे रंगीत छटा. जितके वेगळे रंग तश्याच वेगळ्या छटा. चांगलं वाईट असं काही नसतं माणसां मध्ये "No one is perfect" म्हणतात ना. प्रत्येक माणसात काही चांगले काही वाईट गुण असतात चांगल्या आणि वाईट रंगांचा मिश्रण असतो माणसाचा स्वभाव. किती चांगले आणि किती वाईट हाच काय तो फरक. दोन लोकांचा आपापल्यात पटतं म्हणजे काय हो? त्या दोन व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या स्वभावाच्या रंगसंगती  घेऊन त्यांना आवडेल असं चित्र साकारू शकतात.आणि ज्यांचा पटत नाही त्यांचा काय? त्या व्यक्ती म्हणजे एक मेकांना न आवडलेले रंग असतात. जे एकत्र येऊन कधीच छानस चित्र रेखाटू शकत नाहीत.ह्याचा अर्थ ते रंग वाईट असतात असं नाही तर रंगसंगती न मिसळणाऱ्या असतात. बर्याचदा अनेक लोकांना पडणारा प्रश्न आपल्या आयुष्यातला जोडीदार कसा असावा? ज्याच्यासोबत तुम्ही एक सुंदर चित्र तुमचा "master piece" साकारू शकाल असा. त्याच्या चांगल्या गुणांची कदर करून आणि त्याच्या वाईट गुणांना accept करून त्याला बदलायला न लावता त्याने रेखाटलेला चित्र आपल्या चांगल्या रंगानी सुंदर कराव ना कि त्याचे वाईट गुण उकरून काढून, बोलून दाखवून त्यालाच चित्र बदलायला लावाव मग ते कृत्रिम होऊन जात नाहीतर विकृत दिसू लागतं.चित्र मिळून रेखाताव. ते एकट्यानेच रेखाटण्याचा भर एका जोडीदाराने दुसर्या जोडीदारावर टाकू नये.मग त्यात तोच तो पण येतो
कंटाळवाणा होऊन जातं.

माझ्या सर्व मित्र मैत्रीणीना त्यांच्या "Master piece " साठी  all the best 

तुमचीच 
चारुता