Saturday, April 30, 2011

आयुष्य एक चित्र

आज खूप दिवसांनी एका मैत्रिणीशी बोलले.रेश्मा आपटे. एक अशी मैत्रीण जिला मी न भेटलीये न पाहिलंय पण खूप जवळची कदाचित जिवाभावाची म्हणाले तर गैर वाटणार नाही. आमच्या गप्पा खूप रंगल्या अगदी diary  पासून आयुष्या पर्यंत आणि तीच माझी प्रेरणा blog लिहिण्या मागची. आयुष्य असतं तरी काय नेमका? माणसं वेग वेगळी का असतात? पु . ल. नी व्यक्ती आणि वल्ली लिहावा इतके वेगळे स्वभाव का असतात? विचार केल्यावर उत्तर मिळालं सगळच चांगलं किवा सगळं वाईटच  असतं तर जगण्यात मजा आली असती का?आयुष्य एक चित्र असतं माणसं त्याचे चित्रकार आणि त्यांचे स्वभाव म्हणजे रंगीत छटा. जितके वेगळे रंग तश्याच वेगळ्या छटा. चांगलं वाईट असं काही नसतं माणसां मध्ये "No one is perfect" म्हणतात ना. प्रत्येक माणसात काही चांगले काही वाईट गुण असतात चांगल्या आणि वाईट रंगांचा मिश्रण असतो माणसाचा स्वभाव. किती चांगले आणि किती वाईट हाच काय तो फरक. दोन लोकांचा आपापल्यात पटतं म्हणजे काय हो? त्या दोन व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या स्वभावाच्या रंगसंगती  घेऊन त्यांना आवडेल असं चित्र साकारू शकतात.आणि ज्यांचा पटत नाही त्यांचा काय? त्या व्यक्ती म्हणजे एक मेकांना न आवडलेले रंग असतात. जे एकत्र येऊन कधीच छानस चित्र रेखाटू शकत नाहीत.ह्याचा अर्थ ते रंग वाईट असतात असं नाही तर रंगसंगती न मिसळणाऱ्या असतात. बर्याचदा अनेक लोकांना पडणारा प्रश्न आपल्या आयुष्यातला जोडीदार कसा असावा? ज्याच्यासोबत तुम्ही एक सुंदर चित्र तुमचा "master piece" साकारू शकाल असा. त्याच्या चांगल्या गुणांची कदर करून आणि त्याच्या वाईट गुणांना accept करून त्याला बदलायला न लावता त्याने रेखाटलेला चित्र आपल्या चांगल्या रंगानी सुंदर कराव ना कि त्याचे वाईट गुण उकरून काढून, बोलून दाखवून त्यालाच चित्र बदलायला लावाव मग ते कृत्रिम होऊन जात नाहीतर विकृत दिसू लागतं.चित्र मिळून रेखाताव. ते एकट्यानेच रेखाटण्याचा भर एका जोडीदाराने दुसर्या जोडीदारावर टाकू नये.मग त्यात तोच तो पण येतो
कंटाळवाणा होऊन जातं.

माझ्या सर्व मित्र मैत्रीणीना त्यांच्या "Master piece " साठी  all the best 

तुमचीच 
चारुता